Posts

Showing posts from February, 2021

पक्की मांड अनं मजबूत मनगटाचा विरयोद्धा 'फकिरा'..!!

Image
मांग जातीत जन्मलेले राणोजी, फकीरा, सावळा आणि एकूण एक धाडसी आणि शूर वीर मांगाचे चित्रण अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या फकिरा या कादंबरीत केले आहे. फकीरा कादंबरीत अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला संदेश समजून घेतला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. परंतु मांग समाजातील लेखक, विचारवंत, बुद्धिमान मंडळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, संघर्षाचे तत्त्वज्ञान जसे निटपणे समजून घेत नाही. अण्णा भाऊ हे मांग जातीचे असल्यामुळे इतर जातींना हे तत्वज्ञान समजून घेण्यात फारसे स्वारस्य वाटत नाही. वाचकाकडून फकीरा कादंबरीचे वाचन होत असले तरी त्याची फारशी चर्चा बाहेर जाऊन करण्याची त्यांची मानसिकता नाही. कारण ही कादंबरी एका मांग लेखकानं मांग जातीवर लिहिलेली आहे असा ब्राम्हणी दृष्टिकोन धरून बसलेले आहेत. मांग समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी वाचनाचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. हे प्रमाण वाढविण्यासाठी काही विशेष प्रयत्न होताना कुठे दिसत नाहीत. समाजातील शिकला सावरलेला वर्ग अशा बाबीवर वेळ न घालवता पगार-भत्ते आणि जवळचे नातेवाईक यापलीकडे जग माणायला तयार नाही. कंदूरी, जावळ, नवस, वाढदिवस आणि घरगुती समार