मातंग संघटनांचा सतरा कलमी कृती कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे ठरला मातंग समाजाचा 17 कलमी कृती कार्यक्रम ....................................................................................महाराष्ट्रातील मातंग संघटना प्रमुखांची दिनांक 5 जून 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील सुभेदारी विश्रामगृहाच्या भव्यदिव्य स्वागत कक्षात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे जिल्हाध्यक्ष तथा मातंग क्रांती मोर्चाचे संयोजक संजयभाऊ ठोकळ हे होते. या बैठकीत मुंबई, पुणे, नाशिक, नगर, लातूर, नांदेड, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, नागपूर, परभणी, हिंगोली, वाशिम, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) आदी जिल्ह्यातून संघटना प्रमुख व पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली: 1. आरक्षण वर्गीकरण होणार असलं तरी मातंग दलितांचं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, शिकल्यानंतर त्या प्रत्येक मुलाला संधी मिळाली पाहिजे यासाठी सामाजिक न्यायाचा लढा वृद्धिंगत केला पाहिजे. 2. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. 3. अनुसूचित जात...