अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन 2024

परभणी-शहरात 29 डिसेंबर रोजी लोकनेते शहिद विजय वाकोडे नगरी, महात्मा फुले विद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे राज्यस्तरीय अण्णाभाऊ विचार साहित्य संमेलन संपन्न झाले. शहीद सोमनाथ सुर्यवंशी विचारपीठावर संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाचे उदघाटन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या शुभहस्ते झाले तर संमेलनाध्यक्ष म्हणून ग्रामिण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे.

ग्रंथ दिंडीने वेधले शहरवासियांचे लक्षः

बस स्थानकाजवळ असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयापासून सकाळी ग्रंथ दिंडी निघाली. संविधानाची प्रत, अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा, अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथा संग्ग्रह, जगतगुरू तुकोबारायांची गाथा, महात्मा फुले समग्र वाडःमय, ज्ञानेश्वरी आदि ग्रंथ संपदा फुलांनी सजविलेल्या एका पालखीत मांडून ग्रंथ दिंडी संमेलन स्थळाकडे मार्गस्थ झाली. संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ, स्वागताध्यक्ष अजय गव्हाणे, अॅड. विजयराव गव्हाणे, अॅड. अशोक सोनी, सुप्रसिध्द कवी देविदास फुलारी, शंकर वाडेवाले, प्रा. महेश मोरे, प्रा. राम कटारे, अमोल रणखांब, सारजाबाई भालेराव, जानकाबाई वाव्हळे, साहेबराव वाव्हळे, विजयमाला मोरे आदींनी पालखी वाहिली. 

ग्रंथ दिंडीचे संयोजन हभप नामदेव मोरे महाराज, शंकर कसाब महाराज, राम मोरे महाराज, पंचशिला लहाने, सौ. उषाताई सुतार, सौ. वर्षा पारवे, सौ. विद्या चौधरी, सौ. बोराडे, लखनसिंह जाधव, गुलाबराव हरकळ, रमेशराव नाईकवाडे, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश आलट, गजानन देशमुख, प्राचार्य तुळशीराम वानरे, कैलाशराव लोणसने, प्रदीप चव्हान, अमोल क्षीरसागर, प्रद्युम्न शिंदे, सुभाष येवतकर, विजय भालेराव, प्रा. अरूण गव्हाने, प्रा. जयदीप कदम, शिवाजी बिरसे, धर्मा शिंदे, मोहन अल्हाट, आकाश परसोडे यांनी केले होते. दिंडीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी बाल गोपाळांसह लेखक, कवी, कर्मचारी अधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. रणहलगी, ढोल ताशे, संबळ, झांज, लेझीम आदी वाद्यांच्या गजरात निघालेल्या पालखीने शहरवासिंयाचे लक्ष वेधून घेतले होते.

दिमाखदार उदघाटन सोहळा अनं आश्वासक चर्चाः

संमेलनाचे उदघाटन राज्यमंत्री ना. मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार होते परंतु मंत्री मोहोदयांना अचानक मुंबईत सरकारी कामानिमित्त जावं लागल्यामुळे संमेलनाचे उदघाटन सचिन साठे यांच्या शुभहस्ते समईच्या वाती पेटवून उदघाटन करण्यात आले. सर्व जाती धर्माचे, सर्व राजकीय पक्षांचे, संघटनाचे नेते, कार्यकर्ते या मंचकावर उपस्थित झाल्यामुळे बहुरंगी फुलांची माळ गुंफून समाजाचरणी अर्पण करावी तदवतच हा विचारमंच सजला होता. या मंचकावर झालेली चर्चा देखील खुप आश्वासक अशीच होती. मंचकावर स्वागताध्यक्ष अजयराव गव्हाणे, उदघाटक सचिन साठे, आ. रत्नाकर गुट्टे, अॅड. विजय गव्हाणे, अॅड. अशोक सोनी, संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ, देविदास फुलारी, सतिश कावडे, अमोल रणखांब, शंकर वाडेवाले, प्रा. महेश मोरे, प्रा. प्रल्हाद मोरे, सचिन देशमुख, पी. एन. रणखांब, संदीप माटेगावकर, अण्णासाहेब तोडे, गजानन वैरागड, गौतम मुंढे, के. के. भारसाखळे, पंडीत कांबळे, नारायण शिंदे, उत्तम गोरे, प्रकाश बनपट्ट, अशोक उबाळे, दत्ता तांबे, माऊली साळवे, एल. डी. कदम, लक्ष्मन कांबळे, किशोर कांबळे, विशुध्दानंद वैराळ, अमर गालफाडे, दिनेश ताकतोडे आदींची उपस्थिती होती.

आधूनिक जगातील प्रश्नांचा धांडोळा घेत उत्तम प्रतिचे मुल्यधिष्टीत साहित्य निर्माण करणे काळाची गरज आहे - संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ

माणसाला जिवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळायला हव्यात परंतु देशातील ग्रामिण भागातील माणसाच्या अद्याप या तीनही गरजा भागलेल्या नाहीत. अलीकडे माणुसकीचा ओलावा कमी होवू लागला. माणूस स्वार्थामागे धावू लागला, प्रेमाची नाती सोडून संपत्ती, पैसा भौतिक साधनांशी नातं जोडू लागला, पर्यावरणाचा ऱ्हास, स्त्रिभ्रूण हत्या, वृधाश्रमाची वाढती संख्या, हुंड्यासाठी स्त्रियांचा होणारा छळ, तरूण वर्गात वाढती व्यसनाधिनता, नापिकीमुळे कर्जापायी शेतकरी आत्महत्या करत आहे, वाढत्या वाहानांच्या संख्येमुळे आपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. या सर्व बदलाची बाजू लेखकांनी सशक्त ताकदीने मांडली पाहिजे. आज संपूर्ण देश एका विचीत्र आवस्थेतून जात आहे. जागतिकीकरण, संगणक, इंटरनेटच्या युगात माणसं अमाणूष का वागू लागली कदाचित त्यांना त्यांच्या अद्यपुरूषांचा विसर पडलेला असावा त्यामुळे लेखकांनी महापुरुषांच्या साहित्याची व विचारांची बैठक पक्की करून आधुनिक जगातील मुल्यधिष्टीत साहित्य निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन 21 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे केले आहे.

अण्णाभाऊंच्या विचार साहित्यात समाज बदलाची ताकद आहे-सचिन साठे

अण्णाभाऊंच्या साहित्याला प्रचारकी साहित्य म्हणून हिनवल्या गेले. हिनवल्या गेलेल्या साहित्याला उच्यवर्णीय वाचकांनी नाकारलं असलं तरी खऱ्या वाचकांनी मात्र अण्णाभाऊंच्या साहित्याला डोक्यावर घेतलं. गावागावात वाचल्या जाणारे साहित्य अण्णाभाऊंच असल्यामुळे त्यांच्या विचार साहित्यात समाज बदलाची ताकद आहे असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात केले आहे.

मातंग समाजाच्या विकासाठी गावतीथं समाज मंदीर उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही-आ. डॉ. रत्नाकर गुट्ट

मातंग समाज संघटीत नाही. विघटीत समाजाची कुणीही दखल घेत नाही. परंतु हा समाज इमाणदार असल्यामुळे बंड करत नाही. मातंग समाजाने संघटीत होवून आमच्याकडे यांवे आम्ही गाव तिथं समाज मंदीर उभारूत आणि इतर कुठल्याही भौतिक सुविधासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही असा विश्वास साहित्य संमेलनाचे विषेश अतिथी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी दिला आहे.

अण्णाभाऊंचे साहित्य जर का तुमच्या घरात सापडले तर देशद्रोही ठरविल्या जाईल-मा. आ. विजय गव्हाणे

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे वेदनेचे साहित्य आहे. आपल्या वेदना आपल्यालाच दुर कराव्या लागतात असा संदेश अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जगप्रसिध्द असलेल्या फकीरा या कादंबरीत दिला आहे. "मांग लोकांच्या घरात भाकरी सापडली म्हणून त्यांना इंग्रज सरकारने चोर ठरवलं होतं. तुम्ही अशीच भटगीरी करत राहिलात तर उद्या तुमच्या घरात जर का अण्णाभाउंचे साहित्य सापडले तर तुम्हाला देशद्रोही ठरविल्या जाईल आणि त्यामुळे तुमच्यावर अण्णाभाउंचे साहित्य नव्हे तर मनुस्मृती वाचण्याची वेळ येणार असल्याचा धोका बोलून दाखवला आहे" "समाजात खुप तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना एका माळेत गुंफून त्यांना प्रोत्साहन देणारा धागा सध्या उपलब्ध नाही आणि समाजाने देखील अशा धाडसी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे" अशी खंत अॅड. विजय गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.

तरूण वर्ग वाचनाकडे वळविण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज- स्वागताध्यक्ष अजय गव्हाणे

हल्लीच्या काळात तरूण वर्ग अभासी जगाच्या पाठीमागे धावतो आहे. सध्याचे आभासी जाग सोशल मिडीयाच्या माध्यमातून युवकांच्या मनावर बिंबवल्या जात आहे. सोशल मिडीयामुळे तुमची हुशारी वाढेल परंतु परिपूर्ण व्यक्तीमत्व निर्माण होणार नाही. एक समृध्द माणूस म्हणून तयार होण्यासाठी वाचन गरजेचे असून तरूण वर्गाला आभासी जगाच्या मृगजळातून सोडवणूकीसाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असून हे कुण्याही एकटयादुकट्याने होणार नसल्याचे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजय गव्हाणे यांनी केले आहे.

सर्वांना संधी निर्माण करून देण्यासाठी नाकारण्याची तयारी ठेवावी लागेल-डॉ. दयाराम मस्के

महिन्याला पाच लाख-दहा लाख कमावणाऱ्या बापांची पोरं बुलेटवरून कॉलेजला येत आहेत. आशा बापांची पोरं जेव्हा शिष्यवृतीसाठी अर्ज करतात तेव्हा वाईट वाटतं. सुखासिन परिवार जो पर्यंत सरकारी सोयी सवलती नाकारणार नाहीत तो पर्यंत तळातील घटकांना न्याय मिळणार नाही. दुर्बल-साधनहिन समाजाला संधी निर्माण करून देण्याच्या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु आज घडीला आरक्षणाचा लाभ धनवान परिवारातील उमेदवारांनाच मिळू लागल्यामुळे आरक्षण वर्गीकरणाची चळवळ पुढे येत असून या चळवळीकडे सकारात्मक भावनेतून पाहाणे म्हणजेच फुले शाहु आंबेडकरांचा विचार जगणे होय असं मत प्रा. डॉ. दयाराम मस्के यांनी आपल्या भाषणात मांडले. परभणी येथे झालेल्या 21 राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनात डॉ. मस्के यांचे विषेश व्याख्यान ठेवले होते.

शेतकरी-शेतमजूरांच्या दुःखाची गायली गाणी

याच साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनात सहभागी झालेल्या कवींनी शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या दुखांची गाणी गावून त्यांच्या वेदेना ऐरणीवर मांडल्या. झालेल्या कवी संमेलनात शंकर वाडेवाले, डॉ. नवनाथ सिंगापूरे, प्रा. राम कटारे, राजेश रेवले, विकास दळवे, सोपान डोके, वारा आघाडे, पांडूरंग वागतकर, सययद चांद तरोडेकर, उत्तम आवचार, दि. फ. लोंढे, दत्ता वालेकर, मारोती डोईफोडे, सुभाष पांचाळ, बबन आव्हाड, जानकाबाई वाव्हळे यांनी आपल्या रचना सादर केल्या. सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले.

अमोल रणखांब यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान 

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मातंग समाजातील युवा नेते अमोल रणखांब यांना समाज भूषण पुरस्कार या मंचावरून प्रदान करण्यात आला आहे.

21 राज्यस्तरीय अण्णाभाउ साठे विचार साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे उत्तम गोरे, प्रकाश बनपट्टे, जितेंद्र गायकवाड, अशोक उबाळे, अविनाश मोरे, एल. डी. कदम, दत्ता तांबे, आबासाहेब लोंढे, पिंटू खनपट्टे कोंडीबा जाधव, इश्वर साबळे, किशोर कांबळे, अजित शिंदे, प्रकाश गायकवाड, पिंटु घोडके, भागवत जलाले, अनिल मोहिते, दिलीप कांबळे, विकास गोरे, सिध्दांत भिसे, अण्णाभाऊ उबाळे, प्रल्हाद उबाळे, ज्ञानेश्वर उबाळे, राजू मगर, विजय पाणबुडे, आबा साळवे, साहेबराव ताटे, माधव गाढे, माधव बिंडे, अंकूश लोंढे, सारजाबाई भालेराव, जानकाबाई वाव्हळे, गीरजाबाई कांबळे, संविधान भिसे, तथागत झोडपे, अमन कदम, शिवा नेटके, सौरभ मोरे, अशिष मोरे, गजानन कसबे, रमेश गायकवाड, साहेबराव वाव्हळे, प्रकाश गालफाडे, राणी गवळी, रामा गवळी. विजय वाव्हळे आदींनी परिश्रम घेतले. सुत्र संचलन अविनाश मोरे यांनी तर आभार प्रदर्शन कॉ. गणपत भिसे यांनी केले.

 (वार्तांकन: गणपत भिसे)

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचे वारसदारः आंबेडकर कि गवई?

मातंग संघटनांचा सतरा कलमी कृती कार्यक्रम